➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा* शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
✈️ *शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड* अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता
🙏 *कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार;* राज्य शासनाने काढले आदेश
📰 *पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत*, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
📰 *दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात;* संरक्षण खात्याची परवानगी
👨🌾 *कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या*; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
📰 *पहलगामध्ये हॉटेल, गाडी मालकानं पैसा घेतला नाही, ड्रायव्हरही रडला* विमान कंपन्यांनी लायकी दाखवत दिल्ली-श्रीनगर विमान तिकीट 38 हजारांवर नेलं, प्रत्यक्षदर्शी अमरेंद्र कुमार सिंहांची पोस्ट
📰 *पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का सुरू झाली?* शरद पवारांचा सवाल, सर्वधर्मियांनी एकजूटीनं राहण्याचं पवारांचं आवाहन
👮 *सोलापूरचे न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकारणी* आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
📰 *पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी असिफ शेख* आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त, दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट
☀️ *तापमानाचा उद्रेक, चंद्रपूरचा पारा 45.6 वर* विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज
👨⚖️ *इतिहास माहिती नसताना स्वातंत्र्य सैनिकांबाबत बोलू नका* स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं
👨🏫 *शिक्षकी पेशाला काळिमा, मुलाला चांगले मार्क्स देतो सांगत महिला पालकावर* शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार, बुलढाण्यात दोन शिक्षकांना बेड्या
👨🌾 *बळीराजाच्या लेकाची यशाला गवसणी* धाराशिवच्या सटवाईवाडीतील पुष्पराज खोतचे 304 क्रमांक मिळवत यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश
📰 *अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले;* संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
📰 *पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात!* आतापर्यंत ८०० प्रवासी परतले
😯 *'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…';* पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
🥺 *पर्यटकांना वाचवताना जीव गमावला;* काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
💹 *आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू २५ एप्रिलला लाँच;* १३.०१ टक्के प्रभावी परताव्याचा दावा
💹 *भारत-पाकिस्तान युद्धांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये चलबिचल* सेन्सेक्स 589 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख 80 हजार कोटी बुडाले
🏏 *टाटा बाय-बाय खत्म! हैदराबादकडून चेन्नईचा टप्प्यात आणून कार्यक्रम*, CSK आयपीएल 2025 मधून बाहेर
🪙 *Gold Rate today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 89,900/- || 24K = 98,350/-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖