नंदुरबार येथे शोक सभेचे आयोजन


नंदुरबार आणि परिसरातील मराठा ज्ञाती बांधवाना सूचित करण्यात येते की, समाजोन्नतीचे कार्य करणारे समाज भूषण भाईदास अमर पाटील यांचे दि. २१/०४/२०२५ सोमवारी वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने स्वर्गवास झाला आहे.

समाजबांधवांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.२७/०४/२०२५ वार रविवार रोजी दुपारनंतर ४ वाजेला  शाहिर हरीभाऊ मराठा समाज मंगल कार्यालय, ज्ञान दीप सोसायटी नंदुरबार येथे समाज तपस्वी मा. नानासाहेब यशवंतराव देवराम पाटील यांचे अध्यक्षतेखालील शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

समाज संघटन, समाजोन्नती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या उपस्थितीसाठी सदर माहिती निर्गमित करण्यात येत आहे अशी माहिती मा. प्रा. दादासाहेब डॉ. बी. एस. पाटील, अध्यक्ष, समाज प्रबोधक, नंदुरबार जिल्हा यांनी दिली आहे.