श्री संजय बच्छाव
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये ही बैठक होणार आहे कांद्याच्या बाजारभाव बाबत बैठकीत चर्चा होणार आहे सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला कमी दर मिळत आहे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहे. यासाठी खात्रीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ निवेदन देणे, अत्यावश्यक उपाययोजना सुचवणे, यावर ही बैठक आयोजित केली आहे.
बैठकीत सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावाचा आढावा घेणे, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च आणि तोट्याची मांडणी करणे, शासनाच्या अनुदान हस्तक्षेप, खरेदी किमान आधारभूत किंमत याबाबत मागण्या करणे, नाफेड, एनसीएसएफचे कांदा खरेदी शेतकरी पूरक करण्यास भाग पाडणे, पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे आदींवर चर्चा होणार आहे.
यावेळी संघटनेचे राज्य विभागीय जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे श्री जयदीप भदाणे व केदारनाथ नवले यांनी कळविले आहे.