श्री संजय बच्छाव
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत
गुरु-आराध्या फाऊंडेशन, नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सोहळा – २०२६” या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्काराची संकल्पना भगवाताचार्य श्रीशिवमहापुराण कथाकार ह.भ.प संस्थापिका अध्यक्षा डॉ.सौ.अर्चनाताई आहेर, गणोरेकर यांची आहे व अनमोल सहकार्य मा. प्रा. ललित खैरनार, सटाणा ( सचिव), मा.श्री. भाऊसाहेब आर. आहेर, नाशिक (खजिनदार) , गुरुप्रसाद भाऊसाहेब आहेर, (सदस्य) यातून सर्वच व्यक्ती ज्यांचे कार्य अनमोल आहे त्यांचा सन्मान व पाठीवर शब्बासकीची थाप ही बाब गरजेची आहे हा प्रमुख उद्देश आहे. आजच्या काळात समाजासाठी काम करणारे अनेक हात प्रकाशझोतात येत नाहीत. मात्र त्यांचे कार्य लाखो जीवनात आशेचा दीप पेटवत असते. अशाच कर्तृत्ववान, संघर्षातून उभ्या राहिलेल्या आणि सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना योग्य मान-सन्मान मिळावा, या भावनेतून या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना साकारण्यात आली आहे.या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण, अध्यात्मिक व सेवाभावी क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार समर्पित आहे.
श्रीमती इंदूबाई सुदाम नागरे, नाशिक, (नगरसेविका प्रभाग क्र. १०, नाशिक मनपा.) डॉ.डी.डी. धोंगडेपाटील, (नाशिक सीएडी आणि मॅनेजिंग डायरेक्टर, डी. डी. धोंगडेपाटील ग्रुप ऑफ कंपनीज, डीडीज् प्रॉफिटप्लस ) मा.श्री. विवेक बळीराम शिंदे, नाशिक.(विवेकराज सर्विसेस नाशिक, प्रशासकीय सल्लागार / उत्कृष्ट उद्योजक,) मा.श्री. महंत अवधूतगिरी महाराज, पुणे (निसगौपचार तज्ञ हिंदू एकता निर्माण संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संस्थापक: श्री दत्तात्रय सेवा सक्षम व गौशाळा ) मा.श्री. दिपक रत्नाकर दिक्षीत, साक्री (सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्र) मा.श्री. वाल्मीक भागवत गोपालशास्त्री, पनवेल (बीईसी ज्योतिषी / आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्र) मा.श्री. अमोल गंगाधर गुंजाळ, सिन्नर (सिन्नर पोलीस / देशसेवा) मा.श्री. अरविंद वसंत आहेर, गणोरे (मुख्याध्यापक / सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज संगमनेर,) मा.श्री. नितिन (दादा) रामचंद्र शेवाळे. देवळा (सामाजिक व राजकिय क्षेत्र) या प्रमुख अतिथी विविध प्रतिष्ठित, दिग्गज व आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या शुभहस्ते हा पुरस्कार रविवार दि.1 मार्च 2026 रोजी, नाशिक नगरीतील ठिकाण : रोटरी सभागृह, सुविधिनाधनगर, गंजमाळ बस स्टॉप समोर, जैनमंदिराच्या मागे, नाशिक येथे प्रदान करण्यात येणार असून, हा केवळ पुरस्कार नसून 1)संघर्षाची दखल आहे,2)सेवाभावाचा सन्मान आहे,आणि 3) नव्या पिढीसाठी प्रेरणेचा संदेश आहे.“कर्तृत्वाचा गौरव माणुसकीचा सन्मान” या भावनेतून आयोजित करण्यात येणारा हा सोहळा समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरणार आहे.
नाशिक शहरात होणारा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्वे, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समाजासाठी झटणाऱ्या हातांना सलाम करण्याचा हा ऐतिहासिक क्षण नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे.

