श्री संजय बच्छाव
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत

दहिवेल येथे दीपावली निमित्त वाडवडिलांच्या परंपरेनुसार सर्व काका, चुलते, पुतणे व बाहेरगावाहून आलेल्या बहिणी, आत्या, भाऊबंद एकत्र येऊन दिवाळीचा हा गोड सण वेगळ्या पद्धतीने साजरा करून आपल्या पूर्वजांची प्रथा आज देखील टिकवून ठेवली आहे.

 बाहेर गावाहून आलेल्या बच्छाव परिवारातील आत्या, बहिणी यांनी दहिवेल येथील शिवतीर्थ स्मारकाजवळ वेगळ्या पद्धतीने भाऊबीज, दिपवाळी साजरी केली.

 सर्व भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले व तदनंतर महाराजांची सामुहिक आरती करून महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

त्यानंतर भगिनींनी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. बच्छाव परिवारातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, लहान,थोर, तरुण बंधूनी या कार्यक्रमासाठी आवर्जून हजेरी लावली व आपल्या भगिनींसोबत सुखदुःखाच्या गोष्टींची देवाण-घेवाण केली. 

यावेळेस भगिनींनी आपल्या बंधूंसोबत लहानपणाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला. 

तदनंतर शिवतीर्थसमोर बच्छाव परिवारातील सर्व बंधू-भगिनींनी अगदी आनंदात जेवणाचा आस्वाद घेतला.