श्री संजय बच्छाव
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दैनिक स्वराज्यदूत
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ग्रामपंचायत आणि संतप्त ग्रामस्थांनी सकाळी ११ वाजता दहिवेल- नवापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
ग्रामपंचायत तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर करण्यात आलेला निवेदनात उड्डाणपूल व सर्विस रस्ते हे शासनाच्या अंदाजपत्रका नुसार न करता अत्यंत निष्कृष्टरित्या बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामाच्या दर्जा हीनतेमुळे ठिकठिकाणी तडे, खड्डे, वाहतुकीस अडथळे आणि अपघाताच्या घटना घडत असल्याचे नमूद करण्यात आले तरी उड्डाणपूल लगतचे सर्विस रस्ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे बांधले असल्याने शासनाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकानुसार संपूर्ण कामे पुन्हा करावी उड्डाणपूल व सर्विस रस्त्यालगत दिशादर्शक फलक नसल्याने वाहतुकीस गोंधळ निर्माण होतो ते तातडीने बसविण्यात यावे उड्डाणपुलेच्या पूर्वेस बस थांबा न बांधल्याने प्रवाशांना त्रास होत आहे तसेच रस्ता दुभाजक न केल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक धोकादायक ठरत आहे जमीन संपादित क्षेत्रातील मंदिर, देवालयांचे नियमानुसार स्थलांतर करून पूर्व बांधणी करावी सर्विस रस्त्यांची लांबी वाढवावी 12 मीटर व नऊ मीटर रुंदीचे गाव रस्ते संपादित केल्याने विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना पूर्व पश्चिम दिशेस सर्विस रस्त्या मार्गे सुरक्षित दळणवळण व्हावे म्हणून या रस्त्याची लांबी वाढविण्याची मागणी करण्यात आली.
सर्विस रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान टाळण्यासाठी तिथे योग्यरित्या स्थलांतर करून दुरुस्त उड्डाणपूल स्थलांतर करून करावी उड्डाणपूल परिसरात पथदिवे नसल्याने रात्री अपघाताचा धोका वाढतो तसेच बोगद्याजवळ गतिरोधक आणि सूचनाफलक बसवावे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सुरक्षित पादचारी मार्ग नसल्याने जीवितहानीचा धोका निर्माण होतो त्यामुळे पादचारी फुटपात तयार करावा सर्विस रस्त्यालगत गटाची निष्कृष्ट काम झाल्याचे पावसाचे आणि सांडपाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व लोक वस्तीत शिरत आहे स्लॅब नसल्यामुळे रोगराईचा धोका वाढत आहे. गटारी लाईनला लागून पुनर्बांधणी करावी सर्विस रस्त्याच्या मधोमध उभे असलेली वीज काम वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असून त्यांच्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
तसेच रस्त्यालगतची पूर्वी जी वृक्ष लागवड होती तशी वृक्ष लागवड पुन्हा करावी अशा सूचना ग्रामस्थांनी दिल्या. तसेच ब्रिज (पुलाचे) आणि साईट पट्टीचे धोकादायक काम झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.ब्रिज आणि साईट पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. या कामासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी पूर्णपणे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत, ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिले. तसेच, निकृष्ट काम तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत कामाची गुणवत्ता सुधारली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सदर आंदोलन दोन तास सुरू होते या आंदोलनामुळे तिन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नियमाप्रमाणे काम होत नाही आणि कामाचा दर्जा सुधारला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. अशी प्रतिक्रिया सरपंच प्रकाश वळवी, उपसरपंच नंदकिशोर महाले, राजेंद्र बच्छाव,हिम्मत बच्छाव,मनोज चौधरी, डॉ दिनेश मराठे,डॉ विनोद बच्छाव, कन्हैयालाल माळी,बापू माळी,महेंद्र बच्छाव,भगवान चौधरी,दिपक पाटील,सागर बच्छाव यांच्यासह शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी यावेळी सांगितले आहे.
ठेकेदार राजेश म्हात्रे,NHAI चे इंजि.आकाश सनेर यांनी मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलकांनी तात्पुरता रस्ता रोको मागे घेतला असला तरी, या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन धोकादायक काम पूर्ण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
संपूर्ण कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करा.
संपूर्ण कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करा.
उड्डाण पुलाच्या भिंतींना तडे गेल्याने आणि एकूण काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने त्रयस्थ तज्ञ संस्थेमार्फत स्ट्रक्चर ऑडिट करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली याबरोबरच ग्रामपंचायतीने वरील सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून लेखिका देण्याची मागणी केली आहे समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



